मुंबई | लोकप्रिय माॅडेल, अभिनेता म्हणून परिचित असलेला मिलिंद सोमण लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. पुढच्या वर्षी मिलिंद त्याची गर्लफ्रेंड अंकिता हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. ५२ वर्षीय मिलिंद सोमण २६ वर्षाच्या अंकिताची जोडी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो.
त्यामुळे या प्रेमी जोडप्यांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर मोठी गर्दी होईल हे मात्र नक्की आहे. या दर्दी गर्दी साठी मिलिंद सोमणच्या फॅनला काही महिने थांबवे लागेल. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात लग्नाविषयी मुहूर्त सांगण्यात येईल.