नागपूर | विधानमंडळात जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचे काम करण्यात येते. विधानमंडळात करण्यात आलेले कायदे समाज घडविण्याचे काम करत असतात. म्हणून कायदे करताना त्यामध्ये समाजाचे प्रतिबिंब येणे अत्यंत आवश्यक आहे. हे नियम, कायदा बनविताना त्यामध्ये सामाजिक प्रतिबिंब असेल तर कायद्याची अंमलबजावणी करणे सोपे जाते, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या संसदीय अभ्यास वर्गात ‘द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्त्वपूर्ण योगदान’ या विषयावर ते बोलत होते.