मुंबई | अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. मंदार भानुशे यांची तर प्रदेश मंत्री म्हणून अनिकेत ओव्हाळ यांची निवड करण्यात आली. प्रा.मंदार लक्ष्मीकांत भानुशे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत गणित या विषयाचे अध्यापन करतात. वसई येथे निवास आहे. त्यांचे शिक्षण M.Sc पर्यंत पूर्ण झाले आहे. गेली १३ वर्षे अध्यापन कार्य करत असून, गणितामध्ये शालेय विद्यार्थ्यांना रुची निर्माण व्हावी व त्यांनी गणितात संशोधन करावे यासाठी काम करत असलेल्या “Raising A Mathematecian Foundation” चे अध्यक्ष आहेत. त्यांनी १२०० हून अधिक महाविद्यालयीन प्राध्यापकांचे प्रशिक्षण केले आहे.
अनिकेत गौतम ओव्हाळ. मुळचे चेंबूर चे कार्यकर्ते आहेत. मुंबई येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी M.Sc (IT) चे शिक्षण घेतले आहे. २०११ पासून अभाविपच्या कार्यात सक्रीय आहेत. विविध महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रीये मधील भ्रष्टाचार, शिष्यवृत्तीतील गोंधळ या विरोधात यशस्वी आंदोलन केले तसेच शहरी नक्षलवादाच्या विरोधात महाविद्यालयांमध्ये जनजागृती त्यांनी केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभार विरोधात २०१६ ला निघालेल्या छात्र हुंकार मोर्चा व या वर्षी online पेपर तपासणीमधील अक्षम्य दिरंगाई विरोधातील आंदोलनाचे नेतृत्व केले आहे