अहमदनगर | राज्याच्या हिताचे जलनियोजन करण्याची राज्य सरकारची भूमिका असून सर्वांना एकत्रित घेऊन या प्रश्नावर काम करणार आहे आणि असे जलनियोजन करणे, हीच पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे-पाटील यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
प्रवरानगर येथे स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.