नागपूर | वंचित समाजाला प्रगतीच्या पथावर आणण्यासाठी लोकोत्तर चळवळ अर्थातच तांडेसामू चालो या चळवळीची सुरुवात राज्यात झाली आहे. महात्मा गांधी यांच्या खेड्याकडे चला या विचारांना ख-या अर्थाने सार्थक करणारी चळवळ आहे. सामाजिक कार्यकर्ते एकनाथ पवार यांनी धोरणात्मक बांधणी करुन ही चळवळ उभी केली आहे.
“भटक्या- विमुक्तांना त्यांच्यामधील अभिनव कौशल्य, आणि जिज्ञासा दाखवून त्यांना वैचारिक विकास घडवून आणण्याचे काम तांडेसामू चालो अभियानातून होताना दिसत आहे.” असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यावेळी म्हणाले याप्रसंगी आमदार हरिभाऊ राठोड आणि अभियानाचे प्रवर्तक एकनाथ पवार उपस्थित होते.