मुंबई भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे दोन दिवसाच्या मुंबई भेटीसाठी आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या खास विमानाने आगमन झाले. महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.