मुंबई | दोन दिवसाच्या मुंबई भेटीनंतर आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दिल्लीकडे प्रयाण केले.
उपराष्ट्रपतींना निरोप देण्यासाठी विमानतळावर महाराष्ट्राचे राज्यपाल चे.विद्यासागर राव, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा व तिन्ही दलाचे वरिष्ठ अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.