मुंबई | तेलंगणा राज्यात बंजारा समाजातील लोकांवर झालेल्या भ्याड हल्लाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात निंदा केली. तेलंगणा राज्यातील बंजारा समाजाला सर्वतोपरी सहकार्य करु असे ही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
या भ्याड हल्ल्यात ५ लोक मृत्युमुखी झाले होते तर शेकडो जखमी. यासंदर्भात राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष आमदार हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.