नाशिक | शहराला नवा आकार देण्याचे काम बांधकाम व्यावसायिकच करू शकतात. शेल्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिकचा ब्रॅण्ड विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने समृद्धी महामार्गास नाशिकसाठी ‘डेडिकेटर कनेक्टर’ देण्याचा निश्चित विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
क्रेडाई नाशिकच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित ‘शेल्टर-१७’ प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.