मुंबई | जे देश आपल्याकडील लोकसंख्येचे रुपांतर कुशल मनुष्यबळात करतात ते देश विकासाकडे वाटचाल करतात. सध्या आपल्या देशाला ही संधी उपलब्ध आहे. हे करताना शिक्षण क्षेत्राचे योगदान फार महत्त्वाचे असणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शतकमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.