मुंबई | कमला मिल आवारातील आग दुर्घटना प्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या आणि प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या मुंबई महापालिकेतील पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांनी बेकायदेशीररित्या परवानग्या दिल्याचे स्पष्ट झाल्यास अधिकाऱ्यांवर तसेच संबंधित मालक-चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंड परिसरातील मोजो आणि वन अबव्ह या उपाहारगृहांना (पब-रेस्टो) गुरुवारी मध्यरात्री आग लागून त्यात १४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करून १५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत.