मुंबई | देशातील १२ कोटी बंजारा समाजाचे आराध्यदैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीला अर्थातच १५ फेब्रुवारी या दिवशी शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने जारी केले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून सतगुरु संत सेवालाल महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर व्हावी यासाठी शिवसेनेचे नेते तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड प्रयत्नशील होते. महाराष्ट्र शासनाने अध्यादेश जारी केल्यानंतर राज्यभरात जल्लोषाचा वातावरण निर्माण झाला आहे. यासंदर्भात संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहे.