मुंबई | OLX या साईड वर चोरी करून महागडे मोबाईल विकणारी टोळी अखेर पोलिसांच्या ताब्यात . यात एकाच घरातील माय लेक यांचा समावेश आहे. ही टोळी मालाड मधील गोकुलधाम परिसरातील एका दुकानात सॅमसंग हा मोबाईल त्यांना आवडला परंतु पैसे नसलयाचे नाटक करून दुकानातील एक मुलाला आपल्या सोबत घेऊन घरी नेण्याच्या बहाण्याने एक बिल्डिंग मध्ये त्याला खाली थांबून आम्ही येतो म्हणून मागून फरार झाले .
हा प्रकार त्या मुलाने मालकाला सांगितला . मालकाने या गुन्ह्याची नोंद पोलिसात दिली असता पोलिसांनी त्या बिल्डिंग मधील व इतरत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेज द्वारे त्यांचा माघ काढला .व त्यांना पकडण्यात यश आले त्यांची नावे जीत आनंद ,जय आनंद व त्यांची आई उषा आनंद यांना अटक करून पोलीस अधिक तपास करीत आहे.