नवी दिल्ली | कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणाऱ्या देशातील ११३ कर्तृत्ववान महिलांना ‘फर्स्ट लेडी’ हा सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १५ महिलांचा समावेश आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने ‘फर्स्ट लेडी’ हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २० जानेवारी २०१८ रोजी राष्ट्रपती भवनात या महिलांना ‘फर्स्ट लेडी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.