मुंबई | जागतिक पातळीवर भारत व चीन या दोन देशातील द्विपक्षीय संबंध येणाऱ्या काळात आणखी दृढ होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
सह्याद्री अतिथीगृहावर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कार्यकारणीचे सदस्य मेंग जिआंगा फुंग यांच्यासह अकरा सदस्यीय शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.