मुंबई | सातारा जिल्ह्यातील माण तालुका अत्यंत दुष्काळी म्हणून सर्वपरिचित आहे. या तालुक्यातील महिला सक्षम आणि स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभ्या राहाव्यात या उद्देशाने महिलांना बळ देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा यांनी माणदेशी फाऊंडेशनची स्थापना केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई येथे माणदेशी महोत्सवाचे उदघाटन दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते पार पडले तर प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित होत्या.
४ जानेवारी ते ७ जानेवारीपर्यंत चालणा-या माणदेशी महोत्सवाला गेल्यावर्षी २० हजार मुंबईकरांनी भेट दिली होती. यावर्षीचे महोत्सवाचे आकर्षक चेतना सिन्हा याचं पुस्तक ‘छावणी; एक भागीरथी प्रयत्न’ आहे. २१ एप्रिल २०१२ ते १६ सप्टेंबर २०१३ या दीड वर्षात १२९३६ गुरांसाठी आणि तीन हजार कुटुंबाची चारा छावणी माणदेशी फाऊंडेशनने चालवली होती. छायाचित्राच्या माध्यमातून छावणीचे पुस्तकी रुपातून संबंध दर्शन होणार आहे.