मुंबई | राज्य शासनाच्या विरुद्ध हल्लाबोलचा दुसरा टप्पा मराठवाड्यात १६ जानेवारीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घेण्यात येणार आहे. यापूर्वी विदर्भात हल्लाबोल आंदोलन राष्ट्रवादीने केले होते. सर्वसामान्य नागरिकांना, शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी शासनाच्या विरुद्ध हल्लाबोल करण्यात येईल.
मराठवाड्यातील औरंगाबादसह आठही जिल्ह्यात राष्ट्रवादीने हल्लाबोलचे एल्गार करणार आहे. असे राष्ट्रवादीचे पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.