मुंबई | सायबर चोरीपासून वाचण्यासाठी ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच कोणतीही बँक अथवा वित्तीय संस्था ईमेलद्वारे वैयक्तिक माहिती मागवित नाही.
त्यामुळे लिंक पाठवून माहिती मागणाऱ्या ईमेलपासून सावध रहावे, असा सल्ला आयसीआयसीआयचे दक्षता विभागातील उपमहाव्यवस्थापक ग्यान बराह व विभागीय व्यवस्थापक उमंग शहा यांनी दिला. महाराष्ट्र पोलिसांच्या रेझिंग डे निमित्त महाराष्ट्र सायबरच्या वतीने सायबर सुरक्षा विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.