पुणे | राज्य शासनाच्या कला संचालनालयामार्फत होणारे या वर्षीचे विद्यार्थी विभागाचे ५८ वे राज्य कला प्रदर्शन बारामती, जि. पुणे येथे संपन्न होत आहे. अभिजात कलेचा निरंतर वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रातील कलाकारांच्या प्रतिभेला व अंगभूत कलेला प्रोत्साहन देण्यासाठी कला संचालनालयामार्फत प्रतिवर्षी ‘राज्य कला प्रदर्शन’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जातो.
या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व उदयोन्मुख कलाकारांचे स्वागत करण्यात आले. राज्यातील विद्यार्थ्यांचे कलाविष्कार पाहण्यासाठी भेट द्या असे आवाहन करण्यात आले आहे.