मुंबई | आरोग्य विभाग आणि जॅान्सन ॲण्ड जॅान्सन यांच्यात आज राज्यातील आरोग्य क्षेत्रामध्ये क्षयरोग, माता व बाल मृत्यू यासंदर्भात जाणीव जागृती आणि आशा व एएनएम यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. मंत्रालयात आरोग्यमंत्री डॅा. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.
यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॅा. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त संजीव कुमार, जॅान्सन ॲण्ड जॅान्सनचे कार्यकारी संचालक सुशोभन दासगुप्ता उपस्थित होते.