बुलडाणा | समाज व्यवस्थेमध्ये मुलींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. या समाजव्यवस्थेत मुलींचे स्थान टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. वंशाचा दिवा देणाऱ्या मुलीच्या जन्माला नाकारणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीला सोडायला लावून ‘कन्या माझी भाग्यश्री’ ही योजना घराघरात पोहोचविण्यात येणार आहे.
मुलीच्या जन्माचे समाजाने सर्वार्थाने स्वागत करून महिलांना सक्षम करावे, असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सिंदखेड राजा येथे केले. सिंदखेड राजा येथील जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर ‘कन्या माझी भाग्यश्री’ योजनेच्या जाणीव जागृती रथयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.