मुंबई | जगातील अनेक भाषा संकटात असताना हिंदीची वाढ होत आहे. मातृभाषेतून देण्यात आलेले ज्ञान सुलभरित्या समजते त्यामुळे आपल्याला तंत्रज्ञानाचा अवलंब करुन हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन द्यावे लागेल, त्यामुळे त्यांचा विकास होईल असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज केले.
केंद्र शासनाच्या राजभाषा संचालनालयामार्फत राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स (आरसीएफ) कॉलनी येथे आयोजित पश्चिम व मध्य क्षेत्रांचे राजभाषा संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी राजभाषा विभागाचे सचिव प्रभास कुमार झा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.