मुंबई | स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत देशात गेल्या तीन वर्षात ५ कोटींहून अधिक घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गेल्या तीन वर्षात ५० लाख ८ हजार ६०१ शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे, तर राज्यातील १६ जिल्हे व ३४ हजार गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने देशाच्या ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत झालेल्या कामाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.