मुंबई | ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाची अट ६५ वर्ष वरुन ६० वर्ष करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत मंत्रालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, डॉ.विनोद शहा तसेच विविध ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.