सोलापूर | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने सोलापूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी. नवीन योजना प्रस्तावित करताना भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले.
सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदार संघातील माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक श्री. खोत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.