मुंबई | देशातील बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी येेेेथे दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल येणार आहेेत. संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीला कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेेश, राजस्थान, गुजरात, गोवा आणि देशभरातील लाखो बंजारा बांधव पोहरादेवी येथे माथा टेकण्यासाठी येत असतात.
महाराष्ट्रात बंजारा समाजाची सामाजिक ताकद पाहता या सभेमुळे आम आदमी पार्टीला बळ मिळेल असे ‘आप’च्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.