यवतमाळ | यावर्षी अपुऱ्या पावसामुळे नवरगाव धरणात अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असल्याने वणी शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आता शहराची ही समस्या सुटणार आहे. वर्धा नदीवरून पाईपलाईनद्वारे वणी शहराला करावयाच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, वणी नगरपरिषदचे अध्यक्ष तारेंद्र बोरडे उपस्थित होते.