मुंबई | दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या यंदाच्या वार्षिक परिषदेतील वातावरण भारतकेंद्रित झाले असतानाच महाराष्ट्रही त्यात अग्रेसर राहिला. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाकडून आज दिवसभरातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून राज्यातील विकासविषयक वाटचालीची माहिती विविध संस्था-पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.
मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सहकार्याने महाराष्ट्रात मेळघाटातील हरिसाल हे गाव देशातील पहिले ‘डिजिटल व्हिलेज’ बनविण्यासह आणखी डिजिटल गावे विकसित करण्यासाठी मिळत असलेल्या भक्कम सहकार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री.नाडेला यांचे आभार मानले. याप्रसंगी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील पब्लिक क्लाऊड कॉम्प्युटिंग डेटा सेंटर्सच्या विस्ताराबाबतच्या धोरणाची माहिती दिली.