नवी दिल्ली | डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सेंटरच्या वतीने दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित वार्षिक परिषदेत प्रशासनातील नावीन्यपूर्ण उपक्रमासाठीचा डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांना केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय टमटा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र आणि चषक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.