मुंबई | राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांचा परिसर तंबाखूजन्य पदार्थ, गुटखामुक्त करण्यासाठी येत्या जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने ६ फेब्रुवारीपासून राज्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
त्यासाठी राज्यस्तरापासून ते जिल्हास्तरावर पोलीस, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था यांचा समन्वय करण्यात येणार असून स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग घेण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज सिगारेट्स आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे नियमन) अधिनियम, २००३ (कोट्पा) बाबतच्या आढावा बैठकीत दिली.