मुंबई | बीएई सिस्टीम्स ही संरक्षण, सुरक्षा आणि एरोस्पेस क्षेत्रातील बहुराष्ट्रीय ब्रिटीश कंपनी आहे. संरक्षणविषयक उत्पादनांची महाराष्ट्रात निर्मिती करण्यास ही ब्रिटीश कंपनी उत्सुक असून त्यासाठी आवश्यक प्रशिक्षणासाठी ट्रेनर हॉकची निर्मिती करण्यात येणार आहे. बीएई सिस्टीम्सचे अध्यक्ष रॉजर कार यांच्यासोबत दावोस येथे झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली.