मुंबई | पोलाद निर्मितीत जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या आर्सेलर मित्तल कंपनीचे चेअरमन लक्ष्मी मित्तल यांनी दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नियोजित गुंतवणुकीबाबत चर्चा केली. भारतामध्ये स्पेशल ऑटोमोबाईल ग्रेड स्टील प्लँट उभारण्याचे नियोजन ही कंपनी करीत आहे. यावेळी कंपनीच्या भारतातील प्रकल्पासाठी सर्व सहकार्य पुरविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देऊन राज्याच्या वतीने या कंपनीला निमंत्रित केले आहे.