मुंबई | पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी राज्यात यावर्षी २८ जानेवारी व ११ मार्च रोजी पोलिओ लसीकरणाची विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एक कोटी २१ लाख २९ हजार बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी राज्यभरात ८५ हजार बुथ उभारण्यात येणार आहेत. येत्या रविवारी बालकांना पोलिओचा डोस पाजून घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केले आहे.