जागतिक पातळीवर आपल्या भारदस्त लेखणीने ठसा उमटविणा-या व्हर्जिनिया वूल्फ यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात स्त्रीमुक्तीसाठी लिखाण केले. अगदी नऊ वर्षाच्या वयात ‘२२ हाईडपार्क गेट’ नावाचं कौटुंबिक साप्ताहिक प्रकाशित केले. यातूनच त्यांच्या लेखन कार्याची सुरुवात झाली. साहित्य क्षेत्रात आपलं नावाचं वर्चस्व निर्माण करणा-या वूल्फ अतिशय व्यासंगी होत्या. त्यांना संपूर्ण ब्रिटिश साहित्याचा सखोल अभ्यास होता.
शब्दांवर प्रभूत्व असलेल्या वूल्फ स्त्रियांच्या वेदना आपल्या लेखणीच्या माध्यमातून जगापुढे आणल्या. ‘मिसेस डाॅलोवे’, ‘टु द लाईट हाऊस’ ‘द व्हेवस’ यासारख्या अजरामर कांदब-या ‘थ्री गीनीज’ आणि ‘अ रुम ऑफ वन्स ओन’ ही दोन निबंध प्रत्येक वाचकाच्या मनात खोलवर रुजले. त्यांनी रचना केलेली ‘स्ट्रिम ऑफ काॅन्सियसनेस’ ही संकल्पना तर सा-या विश्वाला ठाऊक आहे किंबहुना आजकालच्या बहुतेक चित्रपटात त्यांची संकल्पना पाहायला मिळते. आपल्या वाचकांविषयी त्यांना खूप आदर होता. त्या सांगतात…
“वाचक आहे तर लेखक आहे, त्यामुळे वाचकांना सोप्या शब्दात वाचता यावे, ह्याकडे माझं विशेष लक्ष असते.”
अश्या जागतिक ख्यातीच्या साहित्यिक, कादंबरीकार व्हर्जिनिया वूल्फ यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त द व्हाईस ऑफ मुंबईकडून विनम्र अभिवादन!