मुंबई | मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून यात सीमा शुल्क विभागाचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. व्यवसाय, पर्यावरण, आर्थिक सुरक्षा आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी सीमा शुल्क विभाग कार्यरत असल्याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सीमा शुल्क विभागाच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय कस्टम डे’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल गिरीष लुथरा, मुंबई सीमा शुल्क विभागाचे मुख्य आयुक्त राजीव टंडन, आयुक्त एपीएस सुरी, आयुक्त विवेक जोहरी, ए.झेड बी अँड पार्टनर्सच्या संस्थापक व कार्यकारी संचालक झिया मोदी तसेच कस्टम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.