मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच अरबी समुद्रातील स्मारकासाठी सर्व आवश्यक प्रक्रिया तत्काळ पूर्ण करुन प्रत्यक्ष काम सुरु होईल, याचे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या स्मारकाच्या प्रगतीचा आढावा घेताना एका बैठकीत दिले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संदर्भात वर्षा निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात होती.