नागपूर | देशातील सर्वांत सुंदर व उत्कृष्ट विमानतळ म्हणून नागपूरचा विकास करतानाच येथे कार्गोची अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
श्यामनगर परिसरातील नागपूर सुधार प्रन्यासच्या प्रांगणात आयाेजित नागपूरकरांसाठी महत्त्वपूर्ण अशा उज्ज्वलनगर ते मनिषनगरला जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलासह फ्लायओवर व अंडरपासचे ई- भूमीपूजन, नागपूर पेरीअर्बन योजनेअंतर्गत दहा गावांचा पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ, जिल्ह्यातील 20 पाणीपुरवठा योजना भूमीपूजन तसेच बेलतरोडी पोलीस स्टेशनचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी केंदीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.