मुंबई | जगप्रसिद्ध काळा घोडा फेस्टिव्हलची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे. ३ ते ११ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या महोत्सवात शासनाच्या ‘सहभाग’ या सामाजिक दायित्व कक्षाने स्टॉल उभारला आहे. यामध्ये खादी ग्रामोद्योग विभागाचा चरखा हा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या ‘कल्पवृक्ष’ या संकल्पनेलाही तरुणाईकडून विशेष प्रतिसाद मिळत आहे.