मुंबई | अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती या कार्यक्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या आणि मराठी बाल रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांच्या निधनाने बाल रंगभूमीचा एक अध्याय संपला, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.