मुंबई | अखिल भारतीय विद्यार्थी परिषद(अभाविप) वेळोवेळी महिला सशक्तिकरणाच्या दिशेने आपल्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांतून उल्लेखनीय कार्य करत असते, याचाच एक भाग म्हणून अभाविप मुंबई महानगराच्या वतीने विद्यार्थिनींच्या स्व-सौरक्षणा करिता‘मिशन साहसी’ या अभिनवकार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याकार्यक्रमाचा मूळ उद्देश्य विद्यार्थिनींना धाडसी आणि आत्मविश्वासीबनविणे हे आहे.
मिशन साहसी या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यसभा सदस्य डॉ. सुभाषचंद्रा व लोकप्रिय रक्षा प्रशिक्षक श्री शिफूजी शौर्य भारद्वाज आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे राष्ट्रीय महामंत्री श्री आशीष चौहान यांच्याविशेष उपस्थितित आज दिनांक ५फेब्रुवारी, २०१८ रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संपन्न झाले.
‘मिशन साहसी’ या कार्यक्रमांचेआयोजन विद्यार्थी निधि ट्रस्ट वअखिल भारतीय विद्यार्थी परिषदयांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या प्रतिष्ठित अशा पाच महाविद्यालयात-क्रमशः ठाकुर महाविद्यालय ,एसएनडीटी कैम्पस, मुंबई विद्यापीठ मैदान, सोमैया महाविद्यालय आणि माटुंगा जिमखाना, दादर येथे प्रस्तावित आहे. या कार्यक्रम मार्फत जवळपास २५ हजार विद्यार्थिनींनास्व-सौरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे . प्रथम प्रशिक्षणशिबिराची सुरुवात दिनांक ७ फेब्रुवारी,२०१८ रोजी कांदिवली पूर्व स्थित ठाकुर महाविद्यालय येथून केली जाणार आहे. मार्च महिन्यात या कार्यक्रमाचे भव्य असे आयोजन मरीन ड्राईव, मुंबई येथे केले जाईल, या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि मान्यवर उपस्थित राहतील.