मुंबई | अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित मिशन साहसी या कार्यक्रमाचा पहिला स्वयंरक्षा शिवीर मुंबईतील कांदिवली स्थित ठाकूर स्टेडियम आयोजित झाला. मिशन साहसी चे प्रशिक्षक ग्रॅण्ड मास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज यांनी आज मुंबई च्या मालाड ते दहिसर या भागातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींना स्वयंरक्षा प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी हिंदी चित्रपट आई एम कलाम याचे अभिनेते हर्ष मायर यांची उपस्थिती होती. अभाविप प्रत्येक वेळी सामाजिक काम करत असते आणि या कार्यक्रमात सहभागी होऊन अभिमान वाटत आहे मला असे त्यांनी सांगितले. मिशन साहसी च्या दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम उद्या दिनांक ८ फेब्रुवारी रोजी कांदिवलीतील ठाकूर स्टेडियम येथे होणार आहे