दिल्ली | दिल्लीत १९ व २० फेब्रुवारी २०१८ दरम्यान वैविध्यपूर्ण कार्यक्रमांच्या आयोजनांसह शिवजयंती सोहळा साजरा होणार असून या सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आज दिली.
इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या पटांगणावर सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत, नौदल प्रमुख ॲडमीरल सुनील लांबा, कर्नल ऑफ द रेजिमेंट मराठा लाईट इन्फेट्री पी.जे.एस.पन्नु आणि करविर अधिपती शाहु छत्रपती महाराज यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.