मुंबई | गेटवे आॅफ इंडिया येथे राज्यशासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाने राज्यात विविध खेळांत राज्यची मान उंचावणा-या खेळाडू , मार्गदर्शक, संघटक यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात बंजारा समाजाच्या तीन क्रिडा धुरानीनी पुरस्कार पटकावून बंजारा समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. राज्य सरकारने १९६९पासून हे पुरस्कार देणे चालू केले होते, परंतु आजतागत समाजाला न्याय मिळू शकला नाही, वास्तविक पाहता बंजारा समाजातील लोक अतिशय मेहनती,काटक व सर्व क्रिडा प्रकारात निपून असतांना केवळ राजाश्रय न मिळाल्याने क्रिडा पुरस्कारात मागे होता,यावर्षी सरकारने आॅनलाईन अर्ज मागविण्यात आल्याने समाजातील धुरांनीनी आपले स्थान मजबूत केल्याने कालचा दिवस बंजारा समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार प्राप्त कु.स्नेहल जानुसिंग पवार ह्या मुळच्या माळराजूरा ता.पातूर जि.अकोला येथील रहिवासी असून त्याचे वडील पोलीस अधिकारी आहेत त्यांनी तलवारबाजी या प्रकारात अनेकदा राष्ट्रीय व राज्य पातळीवर प्रथम व द्वितीय स्थान पटकावले आहे. दुसरे श्री अमीत अनिल चव्हाण हे प्रिंप्री अवधन ता.मंगरुळपीर जि.वाशीम येथील रहिवासी असून मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत.त्यानी आटया पाट्या प्रकारात अनेकदा राष्ट्रीय, राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय स्थान मिळवले आहे.
तर तिसरे पुरस्कार प्राप्त श्री. रोहीदास रायसिंग पवार हे उमरीगड ता.मानोरा. जि.वाशीम रहिवासी असून बाकलीवाल विघालय वाशीम चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत.त्यांना संघटकासाठी दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांनी तलवारबाजी या क्रीडा प्रकारासाठी भरीव योगदानाबद्दल त्यांची निवड झाली आहे.
या पुरस्काराचे स्वरूप १लाख रोख स्मृतिचिन्ह,कलर कोट असे असून राज्यपाल विघासागर राव,क्रिडामंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री शिवतारे महापौर विश्वनाथ महाडेश्वर प्रधानसचिव नंदकुमार, आयुक्त सुनील केंद्रेकर याच्याउपस्थितीत गौरविण्यात आले आहे.सदर पुरस्कार सोहळ्यात बंजारा क्रिडाधुरांनीनी इतिहास घडविल्याने नंदूरबारचे जिल्हा क्रीडा अधिकारी धनश्याम राठोड, सामाजिक कार्यकर्ते राजेश चव्हाण जालनेकर, लेखक रितेश पवार हे आर्वजून उपस्थित होते.