मुंबई | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांची संयुक्त जयंती आज मुंबई विद्यापीठात आयोजन करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन डाॅ. प्रा. वंदना महाजन तर अध्यक्ष म्हणून पूर्व जिल्हाधिकारी बी. के. नाईक तर प्रमुख अतिथी तथा सत्कारमूर्ती म्हणून डाॅ. प्रा. सुनिता राठोड याची उपस्थिती असणार आहे.
याप्रसंगी परिसंवाद होणार असून या संवादासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विचारवंत याठिकाणी आपले विचार प्रकट करणार आहेत.