नवी दिल्ली | एक प्रखर योद्धा, कुशल राज्यकर्ता, उदार व प्रजाहितदक्ष राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने आयोजित शिवजयंती सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत, नौदल प्रमुख ॲडमीरल सुनील लांबा, श्री शाहू छत्रपती महाराज आणि खासदार छत्रपती संभाजी राजे यांची मंचावर विशेष उपस्थिती होती.