मुंबई | आपल्या अभिनव उपक्रमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेहमीच समाजहितासाठी कार्यरत असते. तरुणी निर्भर न राहता निडर व्हाव्यात हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तरुणींना साहसी करण्यासाठी ‘अभाविप मुंबई’, ‘मिशन प्रहार’ आणि ‘विद्यार्थी निधी ट्रस्ट’ च्या माध्यमातून मुंबईच्या महाविद्यालयीतील विद्यार्थिनींसाठी स्वरक्षण प्रशिक्षणासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे दुसरे शिबीर विद्याविहार येथील सोम्मया महाविद्यालय होणार आहे.