मुंबई | देशाची आर्थिक राजधानी मुंबईत जागतिक दर्जाचे डिजिटल मीडिया कंटेट हब बनण्याची क्षमता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघितलेल्या ट्रिलियन डॉलर इकानॉमी स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी मनोरंजन क्षेत्राचा मोलाचा वाटा असेल अशी मते मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स २०१८’ या जागतिक गुंतवणूक परिषदेतील परिसंवादात मांडली गेली.
परिषदेच्या शेवटच्या दिवशी माहिती आणि मनोरंजन क्षेत्राच्या भविष्य निर्मितीसंदर्भातील रंगलेल्या या परिसंवादात सुप्रसिद्ध सिनेकलाकार शाहरुख खान, रिपब्लिक या वृत्तवाहिनीचे अर्णब गोस्वामी, एक्सेल कम्युनिकेशनचे रितेश सिंघानिया, वाय कॉम मीडियाचे शुधांशू, ॲमॅझान या डिजिटल वाहिनीचे विजय सुब्रमण्यम आणि लोकमत वृत्तसमूहाचे ऋषी दर्डा, सूत्रसंचालक विक्रम ओझा यांनी सहभाग घेतला होता.