मुंबई | जागतिक पातळीवर ऐतिहासिक वारसा लाभलेल्या एलिफंटा अर्थातच घारापुरी बेटावर पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने व्यापक सुविधा निर्माण करण्यात येणार असून विदेशी पर्यटकांचे पहिल्या पसंतीचे स्थान अटळ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. केबल कार, मिनी ट्रेनच्या माध्यमातून या बेटाचे सौंदर्य पर्यटकांना अनुभवता यावा यादृष्टीने विचार करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.
मुंबईजवळ असलेल्या घारापुरी अर्थातच एलिफंटा बेटाच्या विद्युतीकरणाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.