मुंबई | अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्या संयुक्ताने शिफूजी मिशन प्रहार यांच्या सहकाऱ्याने आणि लिजेंडरी ग्रैंडमास्टर शिफूजी शौर्य भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास १५ हजार महाविद्यालयातील विद्यार्थिनींना प्रशिक्षण आत्मरक्षेचे धडे शिकवण्यासाठी “मिशन साहसी” हा उपक्रमाचे भव्य आयोजन ६ मार्च २०१८ रोजी MMRDA ग्राउंड बी. के. सी. येथे होणार आहे.
महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, फिल्म आणि मीडिया सेलिब्रेटी, महिला नेते, खेळाडू व्यक्ती तसेच महिला कलाकार उपस्थित राहणार असून १५ हजार विद्यार्थिनींना सशक्तिकरणाची भावना जागरूक करून महिलांना सुरक्षिततेच्या संबंधीत साहस, संयम आणि धैर्य वाढविण्यासाठी प्रोत्साहित करणार आहेत.
‘मिशन प्रहार’ चे मुख्य उदिष्टय महिलांना आत्मसन्मानी आणि सशक्त बनण्याचे प्रशिक्षण देणे असून प्रशिक्षक लीजेंडरी ग्रँडमास्तर शिफूजी शौर्य भारद्वाज यांनी विद्यार्थीनींना विविध परिस्थितीचा सामना करण्याचे प्रात्यक्षिक ज्ञान दिले. विविध परिस्थितीत मुख्यता पेनाचा वापर करणे, हातातील कडयाचा वापर करणे, क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करणे, तसेच हातांचा योग्यत्या वेळी वापर करुन समोरच्या व्यक्तिवर प्रतिकार करणे व शोषण रोखणे अशा विविध प्रकारच्या गोष्टिंतून प्रशिक्षण दिले गेले. एखादा अनुचित प्रसंग जर घडत असल्याचे लक्षात येताच सर्वात प्रथम त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करावा नंतर अंगात असलेल्या शक्तीचा पुरेपुर वापर करुन प्रहार करावा आणि तिथून पळ काढावा आणि सुरक्षित ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करावा.
यामधील उल्लेखनीय गोष्ट अशी की, या विशिष्ट कार्यक्रमाच्या प्रथम शिबिराची सुरुवात ७ आणि ८ फेब्रुवारी, २०१८ ला कांदिवली पुर्व मधील ठाकुर कॉलेजच्या मैदानात झाली. या कार्यक्रमाचे दुसरे शिबिर विद्याविहार येथे २२ आणि २३ फेब्रुवारीला सोमय्या महाविद्यालयाच्या मैदानात पार पडले. तसेच पुढील शिबीर २४ फेब्रुवारीला बी. पी. सी. एल. कॉलेज वडाळा येथे संपन्न झाले. आणि या कार्यक्रमाचे चौथे शिबीर ४ फेब्रुवारीला मुंबई स्पोर्ट क्लब असोसिएशन ग्राऊंड, सी. एस. टी. येथे पार पडले. पुढील शिबीर २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी एस. एन. डि. टी. जुहू परिसर येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाचा पुढील सराव बी. पी. सी. एल. कॉलेज वडाळा येथे होईल.