रायगड | नेहरु युवा केंद्र आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच प्रांतिय युवा संसद कार्यक्रम जंजिरा सभागृह अलिबाग येथे संपन्न झाला.या कार्यक्रमामध्ये युवक-युवतींना मार्गदर्शन करण्याकरिता पोलीस विभागाचे विशाल वाघाटे सर, दामिनी पथकाच्या महिला पोलीस कर्मचारी जोत्स्ना मासे मॅडम, पत्रकार प्रमिला जोशी मॅडम, स्वयंसिध्दा संस्थेच्या अध्यक्षा तथा स्पर्धा विश्व अकॅडमीच्या सुचिता साळवी मॅडम, प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत प्रिझम संस्थेच्या वतीने करण्यात आले.सुचिता साळवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी युवकांना नेहरू युवा केंद्राची माहिती दिली तसेच युवकांना शासकीय योजनांची माहिती दिली.सुशासन व नागरिकांची जबाबदारी तसेच युवा नेतृत्व विकास तसेच पदवी नंतर पुढे काय याविषयी खूप सुंदर मार्गदर्शन विशाल वाघाटे यांनी केले तर जोत्स्ना मासे यांनी युवकांना व्यक्तिमत्व विकास याविषयी प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले. आजच्या काळात स्पर्ध्येच्या युगात तरुणांचा ओघ स्पर्धा परीक्षांकडे वळविण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच पत्रकार प्रमिला जोशी मॅडम यांनी सहभागी युवक-युवतींना शुभेच्छा देत पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांकरिता अत्यंत उपयोगी असणाऱ्या प्रमिला जोशी संकलित रायगड पोलीस भरती मार्गदर्शिका या पुस्तकाची माहिती देखील त्यांनी युवकांना दिली. प्रिझमच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.